Events / News

25-08-2014

शहर व तालुका प्रतिनिधींची नियुक्ती
More...

27-08-2014

तांत्रिक सहाय्यता समितीचे गठन
More...

20/08/2014

समाजबांधवांना आवाहन ......
More...

2-10-2014

महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे ) समाज महासंघ तांत्रीक साह्यता समिती
More...

19 - 20 December 2015

बल्लारपूर येथे २८ वा उपवर उपवधू व पालक परिचय मेळावा
More...

Important Announcements

मेळाव्यानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या परिचय पुस्तिकेत उपवर उपवधू ची नावे समाजाच्या वेबसाईट वरूनच घेतली जातील .२० नोव्हेंबर २०१५ ही अंतीम तारीख असेल या नंतर येणारी नावे पुस्तिकेत प्रकाशित होणार नाही..........................उपवर -वधूंनी किंवा त्यांच्या पालकांनी आपण वेबसाईटवर दिलेली माहिती बरोबर आहे किंवा नाही हे login करून तपासून बघावे........................................ ज्या उपवर उपवधुंचे विवाह जुळून आले असतील त्यांनी वेबसाईटवरील आपले प्रोफाईल स्वतः login करून DELET करावे किंवा त्याविषयी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कळवावे .................................... दिनांक १९ व २० डिसेंबर २०१५ रोजी बल्लारपूर येथे २८ व्या उपवर उपवधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन ---------------------- -                              

थोड महासंघाविषयी ..............

       महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे) समाज महासंघ ही अखिल भारतीय स्तरावर सुतार (झाडे) समाजाची कार्यरत एकमात्र सामाजिक संस्था आहे. समाजोपयोगी कार्य करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली असून समाजातील विवाह इच्छूक उपवर आणि उपवधूंना परिचय मंच उपलब्ध करून देण्यासोबतच, समाजातील कर्तृत्ववान आणि गुणवंताचा गुणगौरव करण्याचे कार्य महासंघ अविरतपणे करीत आहे. यासोबतच समाजाच्या दृष्टीने आवश्यक आणि उपयोगी बाबींचा शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे कार्य महासंघ करीत आला आहे. काळाची गरज ओळखून महासंघाने आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करीत समाजाची sutarzademahasangh.comया नावाने website सुरु केली. विवाह इच्छूक उपवर आणि उपवधूंना तसेच त्यांच्या पालकांना इच्छित स्थळ शोधणे सोपे जावे याकरिता विवाह इच्छूक उपवर उपवधूंची माहिती website वर उपलब्ध करून देण्याचा महासंघाने प्रयत्न केलेला आहे. तसेच तत्काळ माहितीची देवाणघेवाण करता यावी यासाठी sutarzademahasngh@gmail.comzadesutarmahasangh@yahoo.com या नावाने email ID उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला समाजबांधवां कडून भरघोस प्रतिसाद मिळत असून महासंघाचा हा स्तुत्य उपक्रम समाजोपयोगी ठरतो आहे.

       भारतीय समाजाचा एक महत्वाचा घटक असलेला सुतार(झाडे) समाज संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला असून महाराष्ट्रासोबतच तेलंगना,, छत्तिसगढ,, मध्यप्रदेश आणि इतर राज्यातही समाजबांधवांचे वास्तव्य आहे. मुळात सुतारकाम हा आपला पारंपारीक व्यवसाय करणारा आणि बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रात राहणा-या समाजाला संघटीत करून एक छत्राखाली आणण्याचा पहिला प्रयत्न सुमारे ९७ वर्षापूर्वी चंद्रपूर येथील उद्योजक व जेष्ठ समाजसेवक आणि माता महाकाली मंदिर देवस्थान, चंद्रपूरच्या विश्वस्त मंडळाचे व्यवस्थापक (Manager) दिवंगत व्यंकोबाजी गणोबाजी शास्त्रकार यांनी केला. स्वतःसह विदर्भाच्या विविध भागातील १४ समाजबांधवांना सोबत घेऊन दिनांक १९ ऑक्टोबर १९१७ रोजी "विश्वकर्म वंशिय मयात्मज सुतार झाडे समाज संस्था" या नावाने पहिली अधिकृत समाज संस्था स्थापन केली. सदर संस्थेच्या अध्यक्ष पदावर दिवंगत गणपतराव कृष्णाजी झिलपे, रा. वणी यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वतः दिवंगत व्यंकोबाजी गणोबाजी शास्त्रकारयांनी सांभाळला.

       पुढे स्वातंत्रोत्तर काळात, समाजाला संघटीत व क्रियाशील करण्याकरीता सन १९८४ साली सुतार (झाडे) समाजाची एक समन्वय समिती गठित करण्यात आली. या समन्वय समितीमध्ये दिवंगत शामरावजी झाडे,, म. ता. राजूरकर गुरुजी, बाबुरावजी शास्त्रकार,, एस. टी. माणुसमारे,, राजेश दुधलकर तसेच विद्यमान जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. द. रा. नवघरे, श्री. तुकारामजी गहुकर, श्री. रमेशराव वनकर, ,श्री. शंकरराव गहुकर आदींचा समावेश होता. दिवंगत म. ता. राजूरकर गुरुजी यांच्या पुढाकाराने वणी येथे समन्वय समितीच्या नेतृत्वात आणि वणी येथील समाज बांधवांच्या सहकार्याने दिनांक २५ व २६ फेब्रुवारी १९८४ रोजी समाजाचा पहिला उपवर-उपवधू परिचय मेळावा संपन्न झाला. त्याच काळात या समन्वय समितीला अधिकृत आणि घटनात्मक दर्जा बहाल करण्याच्या दृष्टीने अमरावती येथील जेष्ठ समाज कार्यकर्ते श्री. द. रा. नवघरे यांच्या नेतृत्वात हालचाली सुरु झाल्या. त्या अंतर्गत सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अमरावती यांच्या कार्यालयात दिनांक ४ फेब्रुवारी, १९८५ रोजी महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे) समाज महासंघ या नावाने अधिकृत संस्थेची नोंद करण्यात आली.

       महासंघाचे पहिले कार्यकारीणी मंडळ : अध्यक्ष- श्री शामराव लक्ष्मणराव झाडे, नागपूर, कार्याध्यक्ष-श्री दत्तात्रय रामजी नवघरे, अमरावती, उपाध्यक्ष- श्री रमेश मनोहरराव वनकर, चंद्रपुर, उपाध्यक्ष- श्री तुळशीराम परसराम गहुकर, वर्धा, सरचिटणीस- श्री राजेश रामाजी दुधलकर,नागपुर-, सचिव- श्री कवडेश्वर रोडबाजी बोबडे, हिंगणघाट, सचिव- श्री विलास किसनराव झोडे, बल्लारपूर, कोषाध्यक्ष - श्री पद्माकरराव सदाशिवराव राखुंडे, नागपुर, प्रचारमंत्री- श्री मोरेश्वर कृष्णाजी राखुंडे, चंद्रपुर,सदस्य- श्री बाबुराव केशवराव शास्त्रकार,चंद्रपुर, सदस्य श्री मधुकरराव तानबाजी राजुरकर,वणी.

Top Advertisements

Testimonial

  • महासंघाचे आभार ....... समाजातील उपवर उपवधूंची माहिती असलेली समाजाची अदयावत वेबसाईट सुरू केल्याबद्दल मन:पूर्वक आभार विलास निवलकर बल्लारपूर